नागपूर : दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजना केवळ कागदावरच आहेत. पाच-पाच वर्षे प्रयत्न करूनही व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. शासकीय उपेक्षा पाचविलाच पुजली आहे, अशा स्थितीत आम्ही आत्मनिर्भर व्हावे तरी कसे?, असा प्रश्न दिव्यांग बांधवांनी उपस्थित केला आहे.
नागपूर : लहान भावाने आणलेला समोसा मोठ्या भावाने खाल्ला. त्यामुळे राग भरलेल्या अकरा वर्षीय लहान भावाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना सोमवारी गिट्टीखदान परिसरात उघडकीस आली. विरू नत्थू साहू (रा. गंगानगर, काटोल रोड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
नागभीड, तळोधी वनपरिक्षेत्रात महिन्याभरात तिघांचा बळी घेणाऱ्या वाघाला रविवारी (ता. 19) सायंकाळी वनविभागाच्या चमूने जेरबंद केले. तळोधी वनपरिक्षेत्रातील गोविंदपूर उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक 579 या परिसरात या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले.
नागभीड आणि तळोधी वनपरिक्षेत्रात या वाघाने धुमाकूळ घातला होता.
सोनेगाव (खुनकर) येथील गजानन आडे यांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळून आला. ही घटना 16 जुलै 2020 रोजी घडली. पोलिसांनी तपास केला असता हा खून गावातील देविदास मारोती कुमरे याने केल्याचे लक्षात आले. त्याला अटक करण्यात आली असून त्याने खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली.
अमरावती : अमरावतीच्या अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे. विलगीकरणात असलेल्या नागरिकांच्या ताटात चक्क अळ्या निघत असल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
धारणी (जि. अमरावती) परस्परविरुद्ध तक्रारीवरून दोन गटांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतरही पोलिस ठाण्याच्या परिसरातच जमून दोन्ही गटांनी वाद घातला. त्यानंतर ठाण्यावरच दगडफेक केल्याने पीएसआयसह पाच कर्मचारी जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. 18) रात्री साडेदहाच्या सुमारास धारणी येथे घडली.
#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.